कमकुवत मागणीमुळे आज (सोमवार) सकाळी भारतीय सराफा बाजारात प्रचंड चढ-उतार दिसून आले. सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असतानाच चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. ५ फेब्रुवारीला सकाळी सोने ३५० रुपये प्रति दहा ग्रॅमने महागले. तर चांदीच्या दरात 840 रुपयांची घट झाली आहे. यासह 22 कॅरेट सोन्याचा दर 57,750 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,000 रुपये आहे. चांदीचा भाव 71,090 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे. देशातील इतर शहरांमध्येही दोन्ही धातूंच्या किमतीत चढ-उतार होत आहेत.