---Advertisement---

चांदीने ओलांडला 80 हजाराचा टप्पा, सोन्यातही ऐतिहासिक वाढ ; वाचा जळगावातील आजचे दर

---Advertisement---

जळगाव । दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्यासह चांदीच्या किमतींनी उंच भरारी घेतल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या दरवाढीतून आज काहीसा दिलासा मिळाला आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

आज 5 डिसेंबरला सोने-चांदीचा दर स्थिर आहे. मुंबईत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 5,885 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 6,420 रुपये प्रति ग्रॅम आहे.

जळगावमधील दर
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा दर जीएसटीसह 66,300 रुपयावर पोहोचला आहे. तर विनाजीएसटी 64,300 इतका आहे. दुसरीकडे चांदीचा दर जीएसटीसह 80,350 रुपयापर्यंत आहे. जागतिक पातळीवर होत असलेल्या घडामोडीचा हा परिणाम मानला जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment