मुंबई : भारताने चांद्रयान-३ यशस्वीपणे चंद्रावर प्रक्षेपित केले. तसेच विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण धृवावरील माहितीही दिली आहे. त्यानंतर चंद्रावर अंधार पडल्याने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला स्लीप मोडमध्ये ठेवण्यात आले होते.
२३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण पार पडले. त्यानंतर पुढचे १४ दिवस विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरील वातावरणाचा अभ्यास केला. १४ दिवसानंतर चंद्रावर रात्र झाल्याने विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हरने आपले काम थांबवले होते.
त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पुन्हा सुर्य उगवणार असल्याने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा एकदा सक्रीय होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, ते अद्याप सक्रीय झालेले नाही. चांद्रयान-३ ने २३ ऑगस्ट रोजी लँडिंग केल्यानंतर सूर्यास्तामुळे चंद्रावर अंधार पडण्याची ही दुसरी वेळ आहे.
परंतु, अद्याप लँडर आणि रोव्हर सक्रीय झाले नाहीत. दरम्यान, लँडर आणि रोव्हर पुन्हा एकदा सक्रीय होतील अशी अपेक्षा इस्रोकडून व्यक्त करण्यात येत आहे. इस्त्रोचे शास्त्रज्ञ शेवटच्या दिवसापर्यंत ते जागे होण्याची वाट पाहणार आहेत. ते जागे झाल्यास पुन्हा एकदा नवनवीन प्रयोग करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.