श्रीहरीकोटा : चांद्रयान ३ ही भारताची महत्वाची चंद्र मोहिम आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. याआधीच्या चांद्रयान १ आणि चांद्रयान २ प्रक्षेपित करण्यात आलं होतं. यांच्याद्वारे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात आला. पण आता चांद्रयान ३ चंद्रावरून उतरून तेथील वातावरण आणि परिस्थितीचा अभ्यास करेल. चांद्रयान ३ प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात असतांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान ३ ला महत्त्वाचा भाग रॉकेट लाँचरसोबत जोडण्यात आला आहे. इस्रोने ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-३ ची एन्कॅप्स्युलेटेड असेंबली बुधवारी, ५ जुलै लाँच व्हेईकलशी जोडण्यात आलं आहे. लॉन्च व्हेईकल मार्क-III (LVM3) हे रॉकेट भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने विकसित केलं आहे. चांद्रयान-३ चे प्रक्षेपण जुलै महिन्याच्या मध्यात होईल, असं भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं होतं. त्यानुसार, १३ ते १९ जुलै दरम्यान चांद्रयान ३ प्रक्षेपित करण्यात येण्याची शक्यता आहे.
????LVM3-M4/Chandrayaan-3????️ Mission:
Today, at Satish Dhawan Space Centre, Sriharikota, the encapsulated assembly containing Chandrayaan-3 is mated with LVM3. pic.twitter.com/4sUxxps5Ah
— ISRO (@isro) July 5, 2023
चांद्रयान-3 LVM3 रॉकेटमध्ये बसवण्यात आलं आहे. चांद्रयान-३ प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. इस्रोकडून चांद्रयान ३ लाँच व्हेइकलसोबत म्हणजेच LVM3 रॉकेटसोबत जोडल्यानंतर पुढील चाचणी आणि तपासणी सुरु आहे. चांद्रयान-३ लाँच व्हेईकल मार्क-३ द्वारे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात येईल. प्रॉपेलंट मॉड्यूल ’लँडर’ आणि ’रोव्हर’ला चंद्राभोवती १०० किमीच्या कक्षेत नेईल आणि चांद्रयान ३ अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
— ISRO (@isro) July 5, 2023