चांद्रयान-३ ने आज एक महत्त्वाचा टप्पा पार पाडला आहे. इस्त्रोने चांद्रयान-३ ला चंद्राच्या तीसऱ्या कक्षेमध्ये पोहचवले आहे. आता चांद्रयान १७४ किमी x १४३७ किलोमीटर अंतराच्या लहानशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे.
चांद्रयान-२ निर्धारित टार्गेटच्या पुढे पोहचल्याची देखील शक्यता आहे. मात्र इस्त्रोने याला अद्याप दुजोरा दिलेला नाहीये. इस्त्रोने ९ ऑगस्ट दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी ऑर्बिट मध्ये बदल केला.
म्हणजेच चांद्रयान-३ च्या थ्रस्टर्सना ऑन करण्यात आले. ५ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहचले होते. तेव्हा चांद्रयानाने चंद्राचा पहिला फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता.