---Advertisement---

चारचाकी वाहनावर दगडफेक, अज्ञात सहा ते सात जणां… जळगावात काय घडलं

---Advertisement---

जळगाव : पिंप्राळा येथील पाटीलवाडा परिसरात मध्यरात्री चारचाकी वाहनावर दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्राळा परिसरातील पाटील वाडा येथील बापू ओंकार महाजन (४५) यांनी १९ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांची मालवाहू चारचाकी वाहन (क्र. एमएच १९ सीवाय ४४८७) घराच्या समोर मोकळ्या जागेत उभे केले होते. मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी वाहनावर दगडफेक करून मोठे नुकसान केले. हा प्रकार २० ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

या प्रकरणी महाजन यांनी रविवार, २२ ऑक्टोबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक विनोद सूर्यवंशी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment