---Advertisement---

चारित्र्याचा संशय; विवाहितेला केली जबर मारहाण, पतीवर गुन्हा दाखल

---Advertisement---

पाचोरा : विवाहितेला चारित्र्याचा संशय घेत पतीने जबर मारहाण केल्याची घटना येथील भडगाव रोड भागात ७ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात पती विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पाचोरा शहरातील सप्तश्रृंगी कॉलनी हॉटेल स्वप्नशिल्पच्या मागे पती नवल शिवाजी जाधव हा आपल्या परिवारसह वास्तव्याला आहे. दरम्यान,  ७ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पती नवल शिवाजी जाधव याने पत्नीला चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली.

तसेच विवाहितेचा डावा हात फॅक्चर करून दुखापत केली. शिवाय ‘तुझे हात, पाय छरून छाटून टाकेल’, अशी धमकी दिली. या प्रकरणी पीडित महिलेने पाचोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार  पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment