नंदुरबार : सासरच्या लोकांकडून विवाहितेला चारित्र्याच्या संशयावरून शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार शहादा शहरात समोर आला आहे. याबाबत विवाहितेने पती, सासरा, सासूसह नणंदविरोधात शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपमाला चेतन चौधरी (२७) या विवाहितेचे लग्न दि. १३ जून २०२३ रोजी चेतन लक्ष्मण चौधरी रा. भरवाडे ता. शिरपुर जि. धुळे याच्याशी झाले आहे. ते कामानिमित्त बडोदा (गुजराथ) येथे राहत होते.
लग्नाच्या एक महिन्यानंतर विवाहितेला चारित्र्याच्या संशयावरून पती व नातेवाईक यांनी शारिरिक व मानसिक त्रास देऊन कृरपणे वागणुक दिली तसेच पतीने वेळोवेळी शिविगाळ व मारहाण केली.
फिर्यादीनुसार, पती चेतन चौधरी, सासू भारतीबाई लक्ष्मण चौधरी, सासरा लक्ष्मण सिताराम चौधरी सर्व रा. भरवाडे ता. शिरपुर जि. धुळे व ननंद जयश्री पाटिल रा. पुणे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पो.नि. शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनात स.पो.नी. संजय ठाकूर करित आहेत.