तरुण भारत लाईव्ह । ११ सप्टेंबर २०२३। दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. चारित्र्यच्या संशयावरून पतीने आपल्या बायकोचा खून केल्याची घटना घडली आहे. रागाच्या भरात हा खून करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पतीचा आपल्या बायकोवर संशय होता त्याच रागातून महिलेला मानेवर छातीवर हातावरच अनेक वार केले. या घटनेवेळी त्यांच्या मुलीही तिथे होत्या त्यातील एकाने आईला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी ती जखमी झाली. साजिद असे आरोपीचे नाव असून पत्नीचे नाव निशा आहे. या घटनेनंतर गुरुतेग बहादूर रुग्णालयात नेले. तिला त्या ठिकाणी मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चाकू जप्त केला आहे. आणि आरोपीवर कलम 302 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साजिदला अटक करण्यात आली आहे.