तरुण भारत लाईव्ह । १६ ऑक्टोबर २०२३। ऑक्टोबर महिन्यात शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होत आहे. याचा परिणाम राशिचक्रावर होत असतो. या महिन्यात शुक्राच्या तूळ राशीत चतुर्ग्रही योग तयार होत आहे. या ऑक्टोबर महिन्यात चार ग्रह तूळ राशीत एकत्र येणार आहेत. या योगाचा काही राशींना फायदा होणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
सिंह रास
या काळात या राशींच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. या कालावधीत आत्मविश्वास आणि बळ मिळेल. अडकलेली कामे सहज पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत फायदा होईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.
कन्या रास
या काळात कन्या राशींच्या लोकांना बऱ्याच प्रमाणात फायदा होणार आहे. वाहन खरेदीचा योग आहे. कुटुंबासोबत फिरायला जाण्याची संधी मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात तेजी येईल.
धनु रास
या काळात धनु राशींच्या व्यक्तींसाठी शुभ असणार आहे. काहींना चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. आरोग्यात सुधारणा होईल. व्यवसायात भरभराट होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.