---Advertisement---

चार लाखांच्या लाचेचा मोह नडला : चाळीसगावचा अभियंता नाशिकमध्ये लाच घेताना जाळ्यात

---Advertisement---

चाळीसगाव  : चाळीसगाव बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (अशोक नगर, धुळे) यांना नाशिक एसीबीने नाशिकमधील गडकरी चौकात चार लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर चाळीसगावात खळबळ उडाली. शनिवारी सायंकाळी उशिरा हा सापळा यशस्वी करण्यात आला. क्लस्टर कामाचे बिल काढण्यासह अनामत रक्कम काढून देण्याच्या मोबदल्यात ही लाच मागण्यात आली.

लाच स्वीकारताच केली अटक
नाशिकच्या तक्रारदाराने डॉ.शामा प्रसाद मुखर्जी रुरबन या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग, ता.चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा, ता.चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसीत करण्याचे काम घेतले होते. या कामाची चार कोटी 82 लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाच्या अतिरीक्त सुरक्षा अनामत रक्कम 35 लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात आरोपी विसपुते यांनी पाच लाखांची लाच मागितली मात्र चार लाखात तडजोड करण्यात आली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवली. तक्रारदार हे नाशिकमध्ये आल्यानंतर गडकरी चौकात शनिवारी सायंकाळी लाच स्वीकारताच विसपुते यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत. प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, किरण धुळे , अविनाश पवार, सुरेश चव्हाण आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment