महिला ट्रेनच्या खिडकीजवळ बसून फोनवर बोलत असताना चोरट्याने फोन हिसकावत पळ काढला. मात्र हा चोर प्रवाशांच्या तावडीतून सुटू शकला नाही. संतप्त झालेल्या प्रवाशांनी लगेच मोबाईल चोराला खिडकीला लटकवून शिक्षा केली. त्यानंतर त्यांनी चालत्या ट्रेनला सुमारे 500 मीटर लटकलेल्या चोराच्या डोक्यात सतत फटके मारले. यावेळी तोचोर दयेची याचना करत राहिला, मात्र त्याचे कोणीही ऐकले नाही. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेली ही व्हिडीओ क्लिप बिहारमधील भागलपूर रेल्वे स्थानकाची असल्याचे सांगण्यात येत आहे. मोबाईल चोर चालत्या ट्रेनच्या खिडकीला लटकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा तरुण प्रवाशांकडून वारंवार दयेची याचना करत आहे, मात्र लोक त्याच्या डोक्यावर सतत चपले मारताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये तो तरुण म्हणतोय, सोडा भाऊ. हात मोडला जाईल.
????भागलपुर (बिहार ) : मोबाइल चोर को 500 मीटर तक ट्रेन से लटकाया, VIDEO: चलती ट्रेन में थप्पड़ बरसाते रहे यात्री; वो बोलता रहा-छोड़ दीजिए मर जाएंगे ???????????? pic.twitter.com/TLGJursYR2
— Rahul Yadav ???????? (Follow Back) ↗️ (@RahulKu29607411) January 17, 2024