तरुण भारत लाईव्ह । १२ ऑक्टोबर २०२३। सिनेमा पहायला बऱ्याच जणांना आवडत. कुणी सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघण्याचा आनंद घेत असतं तर कुणी त्यांच्या सोयीनुसार घरीच सिनेमा पाहत असत. अगदी काही सिनेमाप्रेमी सिनेमा प्रदर्शित झाल्यावर लगेच फर्स्ट डे फर्स्ट शो ला जाऊन सिनेमा पाहत असतो. तर अशाच सिनेमाप्रेमींसाठी १३ ऑक्टोबरला फक्त ९९ रुपयांमध्ये सिनेमा पहायला मिळणार आहे.
उद्या म्हणजेच १३ ऑक्टोबरला नॅशनल सिनेमा दिवस हा साजरा केला जाणार आहे. नॅशनल सिनेमा दिवसाच्या निम्मिताने सिनेमाप्रेमींना फक्त ९९ रुपयांमध्ये सिनेमा पहायला मिळणार आहे. शुक्रवारचा दिवस चित्रपटप्रेमींसाठी खास मेजवाणी असणार आहे. असोसिएशनच्यावतीनं देशभरातील ४ हजाराहून अधिक चित्रपटगृहांमध्ये ही ऑफर लागू असणार आहे. पीव्हीआर आय़नॉक्सनं म्हटले आहे की, ही ऑफर काही शहरांमध्ये लागू असेल.
संपूर्ण भारत देशात या तिकिटांची किंमत ९९ रुपये असणार आहे. याविषयीची अधिक माहिती पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलिस आणि मुव्ही टाईम ने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिली आहे. ही तिकीटं प्रेक्षकांना, बूक माय शो किंवा पेटीएमवरुन बूक करता येणार आहेत.