Sharad Pawar : चिन्ह गेलं; कार्यकारिणी बैठकीत नेमकं काय म्हणाले?

मुंबई : चिन्ह गेलं तरी फरक पडणार नाही. आतापर्यंत खूप वेळा चिन्ह बदललं आहे. पण देशातील माहोल बदलत आहे. त्यामुळे लवकरच परिवर्तन होईल. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणालेत.
शरद पवार यांनी आज दिल्लीत त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची कार्यकारिणी बैठक घेतली. या बैठकीत बोलताना पवारांनी चिन्ह गेलं तरी फरक पडणार नाही, असं विधान केलं आहे. ईडीचा राजकारणासाठी वापर सुरु आहे असं सांगतानाच शरद पवार म्हणाले, “ईडीचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय. एजन्सीचा वापर सुरु आहे. काही दिवसांपूर्वी नावच माहीत नव्हतं. ईडीचं नाव माहीत नव्हतं. आजकाल भांडण झालं तर म्हणतात ईडी लावेन.
दिल्लीतील राज्यसभा खासदारच्या घरावर छापा टाकला. आज सकाळी कोणी सांगितलं की इतर राज्यातही सुरु आहे. ममतांच्या सहकार्यावर ही सुरु आहे.देशाचं वातावरण बदलतंय. केरळमध्ये भाजप नाही. तमिळनाडूमध्ये नाही. गोव्यात नव्हती. मात्र निवडून आलेले आमदार फोडून आणली.
आंध्र प्रदेशात भाजप नाही. महाराष्ट्रात भाजप नव्हती. मध्य प्रदेशमध्ये नव्हती. मात्र लोक तोडले. मग सरकार आणलं गेलं. राजस्थानमध्ये नाही. दिल्लीत नाही, पश्चिम बंगालमध्ये नाही. मग आहे कुठे? छोट्या छोट्या राज्यात भाजप आहे. देशात मूड बदलत आहे. आपण सगळ्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे.” असं शरद पवार म्हणाले.