नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी ‘न्यूजक्लिक’ या माध्यम संस्थेचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक केली आहे. संस्थेशी संबंधित अन्य तथाकथित पत्रकार, अभिसार शर्मा, उर्मिलेश आणि परंजॉय गुहा ठाकुर्ता यांचीही चौकशी करण्यात आली. हा मुद्दा चीनकडून मिळणाऱ्या निधीचा आहे. याचा खुलासा कोणत्याही भारतीय माध्यम संस्थेने केला नसून, ‘न्यूयॉर्क टाईम्स’ (NYT) या अमेरिकन वृत्तपत्राने केला आहे. आरोप स्पष्ट आहेत – या मीडिया पोर्टलला चीनचा अजेंडा पुढे नेण्यासाठी 38 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रकरण अवैध व्यवहारांचे आहे. चिनी आणि भारतीय कंपन्यांमध्ये अनेक करार झाले असतील, पण हे सरकारपासून लपवलेले बॅकडोअर सौदे होते. या सर्वांच्या मागे आहे करोडपती नेव्हिल रॉय सिंघम, जो चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रचार शाखेशी संबंधित आहे. केवळ ‘न्यूजक्लिक’च नाही तर जगभरातील अनेक माध्यम संस्थांना पैसे पुरवले. श्रीलंकन-क्युबन वंशाच्या सिंघमशी प्रबीर पुरकायस्थ यांचे ईमेल संभाषणही उघड झाले.
भारत-चीन सीमा वाद असो वा दोन देशांच्या सैनिकांमधील संघर्ष, चीनचे पैसे खाणाऱ्या भारतात बसलेल्या दलालांची निष्ठा कुठे असेल? हे तुम्ही समजून घ्या. वास्तविक, प्रबीर आणि सिंघम यांच्यात जे संभाषण सुरू होते ते भारत-चीन सीमा विवादाची माहिती पुरवण्याच्या संबधित होते. भारतातील चीनचा दलाल त्याच्यासाठी पुरक वातावरण तयार करत होते. त्यामुळे हा देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा प्रश्न असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली.
दरम्यान या प्रकरणी पत्रकार संघटनाही ‘न्यूजक्लिक’च्या समर्थनार्थ उतरल्या. ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया (PCI)’ ने छापेमारीबाबत न्यूजक्लिकची भूमिका घेतली. पीसीआयमध्ये तातडीने बैठक बोलावण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने पत्रकार एकत्र येऊन आंदोलन करण्यात आले. परंजय गुहा ठाकुरता यांना पत्रकारांना संबोधित करण्यासाठी बोलावण्यात आले होते.तसेच संघटनेने पत्रकारांच्या वतीने सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना एक लांबलचक पत्र देखील लिहले.
यावेळी पत्रकाराने त्यांना आरसा दाखवला. सागर मलिक असे त्या पत्रकाराचे नाव आहे. ‘चीनी दलालांना तुरुंगात पाठवा’ असे बॅनर घेऊन एका विशिष्ट टोळीच्या पत्रकारांच्या गर्दीत सागर मलिक एकटेच पोहचले. यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर सागर मलिक यांनी आंदोलन करणाऱ्या पत्रकारांना प्रश्न विचारला की, तुम्ही चीनकडून पैसे का घेतले?यावर आंदोलनातील एक महिला पत्रकार म्हणाली की, “तू कोण आहेस?” आता सामान्य पत्रकार उच्चभ्रू पत्रकारांना प्रश्न कसे विचारणार?, असा प्रश्न त्यामुळे तयार झाला.
तसेच सागर मलिक यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा माझ्या देशाचा प्रश्न येतो तेव्हा अशा दलाल पत्रकारांना मी नक्कीच उत्तर देईन. माझा एकच प्रश्न होता की तुम्ही चीनकडून पैसे का घेतले? तुम्ही राष्ट्रवादी पत्रकार असाल तर चीनकडून पैसे का घेतले? तसेच तुम्ही देशभक्त असाल तर आमच्या शत्रू देश चीनकडून पैसे का घेतले? ते म्हणतात, “जर या दलाल चिनी पत्रकारांचे चीनबद्दलचे प्रेम इतके बाहेर येत असेल, तर चीनच्या गुलामगिरीत असलेल्यांना मी विनंती करेन, त्यांना भारतात काही अडचण असेल तर ते हवे तेव्हा चीन किंवा पाकिस्तानशी संपर्क साधू शकतात.