चॉकलेट केक रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । २७ सप्टेंबर २०२३। चॉकलेट केक हा जवळपास सगळ्यांनाच आवडतो. पण तुम्हाला माहित आहे का? चॉकलेट केक हा आपण घरी सुद्धा बनवू शकतो. चॉकलेट केक घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
मैदा, पीठी साखर, अंडी, ताजे दही, कोको पावडर, खायचा सोडा, वितळलेले लोणी, व्हॅनिला इसेंस

कृती
सर्वप्रथम, मैदा गाळून घ्या. त्यात कोको पावडर आणि खायचा सोडा मिक्स करा. लोणी आणि अंडे एकत्र करा. त्यात साखर घालून चांगले ढवळून घ्या. त्यात दही टाका आणि चांगल्याने मिक्स करा. थोडा थोडा मैदा घालून मिसळत रहा. मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात थोडे पाणी व एसेंस घाला. ज्या भांड्यामध्ये केक बनवायचा त्या भांड्याला तूप लावा

वरील मिश्रण पॉटमध्ये भरा आणि ओव्हनमध्ये ठेवा. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर कुकरमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. फक्त कुकरची शिट्टी काढून घ्यावी. केक थंड झाल्यावर त्यावर चॉकलेट बटर आइसिंग करा.