चोपड्यात महायुतीचा मेळावा; रक्षा खडसेंना विजयी करण्याचा भाजपचा निर्धार

xr:d:DAFtd8oCXa8:2676,j:6171482205281061870,t:24041406

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा येथे नुकतीच महायुतीची बैठक पार पडली. यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला. शिवाय, प्रचारार्थ निवडणूक नियोजनासाठी ही बैठक महत्वपूर्ण ठरली. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

महायुती पदाधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी तसेच महायुती उमेदवार खासदार  रक्षा खडसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी जोमाने कामाला लागून, प्रत्येक बुथवर जास्तीतजास्त मतदान महायुती उमेदवार यांना मिळवून देण्याचे यावेळी आवाहन केले. तसेच यावेळी असंख्य तरुणांनी यावेळी भाजपा मध्ये यावेळी पक्ष प्रवेश केला.

यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यासह राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, घनश्याम अग्रवाल, शांताराम पाटील, राष्ट्रवादीच्या सोनाली नारायण पाटील, विनोद तराळ, आत्माराम म्हाळके, दुध संघ संचालक रोहित निकम, भाजपा जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, अमृत सचदेव, तिलक शहा, विधानसभा निवडणूक प्रमुख गोविंद सैंदाने, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, रवींद्र पाटील, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, मगन बाविस्कर, सौ.ज्योत्स्ना पाटील, नारायण पाटील, जे.टी.पाटील,आशा पाटील, प्रहार तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, पंकज पाटील, रि.पा.ई तालुकाध्यक्ष रवी वाघ, हिम्मतराव पाटील, रा.स.प तालुकाध्यक्ष प्रवीण साबळे, नीलेश पाटील, रंजना नेवे, विपीन पाटील, गजेंद्र सोनवणे, युवराज शहा, परेश देशमुख, राजाराम पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष गिरीष देशमुख, प्रदीप पाटील, अंबादास सिसोदिया, कमल चौधरी, वलय पाटील, नंदलाल धनगर व महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.