Marashtra Politics : माझा पुतण्या जेव्हा मला थांबायला सांगेल तेव्हा मी थांबणार, असं वक्तव्य करून मंत्री छगन भुजबळ यांनी थेट शरद पवारांना डिवचले. काका शरद पवारांना पुतण्या अजित पवारांना वारंवार थांबण्याचा सल्ला देत आहेत. मात्र ते थांबले नाहीत. हाच धागा धरून भुजबळांने उपरोधिक वक्तव्य केलं आहे. मंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच पुण्यात आले होते.
पुण्यातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांची मनधरणी करण्यासाठी भुजबळ पोहचले होते. तेव्हा आता तुमचं वय झालंय असे अनेकजण म्हणतात, मग तुम्ही 2024 ची विधानसभा निवडणूक लढणार का? या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ म्हणाले, माझ्या पुतण्याने मला थांबायला सांगितलं तर मी नक्की थांबेन असं म्हणत पवारांना डिवचले.