---Advertisement---

छत्रपती संभाजीनगरमधील कंपनीला भीषण आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू

---Advertisement---

संभाजीनगर । छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीमध्ये शाईन इंटरप्राईजेस कंपनीला भीषण आग लागली असून या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी झालेल्या कामगारांना घाटी रुग्णालयात दाखल केले असून ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

या कंपनीत हॅन्ड्लोज आणि जॅकेट बनवले जात होते. त्यामुळे कंपनीत कॉटनचे कापड मोठ्या प्रमाणात होते. अचानक रात्री 2.15 च्या सुमारास कारखान्यात आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. कारखान्याला आग लागली तेव्हा तेथे अनेक कामगार झोपले होते आणि कंपनी बंद होती.

आग लागल्याचे कळताच कामगारांच्या नातेवाईकांनी कामगारांना वाचवण्यासाठी आरडाओरड सुरु केली. आगीत मृत्यू झालेल्या सहा कामगारांपैकी चार जणांची ओळख पटली आहे. भुल्ला शेख (65), कौसर शेख (26), इकबाल शेख (26) आणि मगरूफ शेख (25) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व कामगार बिहारमधील आहेत. कामानिमित्त ते आले होते.आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ही आग कशामुळे लागली, यासंदर्भात चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment