---Advertisement---

कारमध्ये 25 मुलांना घेऊन जात होती महिला, पाहून पोलीसही चक्रावले; व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

एक महिला 25 मुलांना एका छोट्या कारमधून कुठेतरी घेऊन जात होती. ट्रॅफिक पोलिसांनी गाडी थांबवली तेव्हा आतील भाग पाहून त्यांना धक्काच बसला. उझबेकिस्तानमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एक महिला मेंढ्या-बकऱ्यांसारखी २५ लहान मुलांना गाडीत घेऊन जात होती. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी गाडी थांबवली तेव्हा आतील दृश्य पाहून ते थक्क झाले. यानंतर पोलीस अधिकाऱ्याने एकामागून एक सर्व निरपराध लोकांना बाहेर काढले. ही धक्कादायक घटना उझबेकिस्तानमधील बुखारा येथे घडली. दरम्यान, ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच, ती पाहून लोक थक्क झाले.

वृत्तानुसार, ही महिला प्राथमिक शाळेतील शिक्षिका असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांची ओळख उघड झालेली नाही. ही महिला तिच्या शेवरलेट स्पार्क कारमधून 25 विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. ही  कार चार लोक बसण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.

दरम्यान, महिला शिक्षिकेचे म्हणणे आहे की, ती दररोज त्याच गाडीतून आपल्या विद्यार्थ्यांना घरी घेऊन जायची. मात्र यावेळी ही महिला वाहतूक पोलिसांच्या नजरेतून सुटू शकली नाही. पोलिसांनी महिलेला खडसावले आणि भविष्यात अशी गाडी न चालवण्याचा सल्ला दिला. वृत्तानुसार, महिलेला सार्वजनिक परिषदेने असुरक्षित ड्रायव्हिंग प्रकरणी शिक्षा सुनावली आहे. मात्र, निर्णयाचा अहवाल अद्याप आलेला नाही.

https://twitter.com/i/status/1703434452003586114

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment