नवी दिल्ली । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. अशातच जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अव्वल ठरले आहेत. मॉर्निंग कंसल्टच्या सर्व्हेत मोदींना सर्वाधिक ७६ टक्के इतके रेटिंग मिळाले आहे.
विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीत सातव्या स्थानावर आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांना फक्त ३७ टक्के इतके रेटिंग मिळाले
याआधी मॉर्निंग कंसल्टने या वर्षी सप्टेंबर महिन्यात जाहीर केलेल्या एका यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक स्तरावर सर्वात विश्वसनीय नेता असल्याचे म्हटले होते. तेव्हा मॉर्निंग कंसल्टने केलेल्या सर्व्हेमध्ये मोदींना ७६ टक्के लोकांनी पंसती दिली होती. तेव्हा सर्व्हेमध्ये मोदींच्या विरोधात फक्त १८ टक्के इतकी मते आली होती.
मॉर्निंग कंसल्टकडून प्रत्येक आठवड्याचे रेटिंग जाहीर केले जाते. या रेटिंगमध्ये मोदी सातत्याने अव्वल स्थानावर आहेत. या सर्व्हेत मोदींची रेटिंग ही ७० टक्क्यांच्या पुढे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन ४० टक्के रेटिंगसह सातव्या स्थानावर आहेत.
लोकप्रिय नेत्यांच्या यादीत या नेत्यांची नावे आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनुमोदन रेटिंग 76 टक्के आहे
मेक्सिकन अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर (66%)
स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अलेन बर्सेट (58%)
ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा (49%)
युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष जो बिडेन 40% च्या मान्यता रेटिंगसह यादीत सातव्या क्रमांकावर आहेत.