---Advertisement---

जगात अशक्य काहीच नाही; दोन्ही हात नसताना तरुणी चालवतेय कार, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्

---Advertisement---

मानवासाठी शरीराचा प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. कुणाला डोळे नाहीत, कुणाला हात-पाय नाही. एखाद्या अपघातामुळे किंवा एखाद्या आजारामुळे माणसाच्या जीवनात अनेकवेळा अशी परिस्थिती निर्माण होते. तरी अशी काही लोक असतात जी हिंमत गमावत नाहीत आणि त्याच भावनेने आपले जीवन जगू लागतात ते पूर्वी जगत होते तसे. अशीच एक तरुणी सध्या चर्चेत आहे, जिला दोन्ही हात नाहीत, पण तरीही ती अशा काही गोष्टी करते, ते  बघून जग थक्क झाले आहे.

जिलुमोल मारिएट थॉमस असे या तरुणीचे नाव आहे. ती केरळची रहिवासी आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मेरीएट हातांशिवायही कार चालवू शकते. यासाठी ती तिच्या पायांचा वापर करते. विशेष म्हणजे तिचा ड्रायव्हिंग लायसन्सही आहे. कोणीतरी पायाने कार चालवते आणि त्याच्याकडे कार चालवण्याचा वैध ड्रायव्हिंग लायसन्सही आहे, असा विचार तुम्ही क्वचितच केला असेल.

https://www.instagram.com/p/C5D12KkJG_h/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

सोशल मीडियावर मॅरियटचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पायांनी कार चालवताना दिसत आहे. दोन्ही पायांचा वापर करून ती  कार चालवायला शिकली आहे. ती तिच्या पायाने गाडीचा गिअरही बदलते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---