जळगाव : प्रसूती झाल्यानंतर अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने एका ३७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना जळगाव जिल्हयात घडलीय. या घटनेनं जिल्ह्यात हळहळ व्यक्त होतेय. हनिफा सजंय तडवी (37) असे मयत महिलेचे नाव आहे.
रावेर तालुक्यातील रसलपूर येथे संजय महेबूब तडवी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. दरम्यान, दि. २१ रोजी रात्री दहाच्या सुमारास पत्नी हनिफा तडवी (३७) हया राहत्या घरी प्रसूती झाल्या. त्यानंतर त्यांना अतिरिक्त रक्तस्त्राव सुरू झाला.
उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा दुदैवी मृत्यु झाला. मयत महिलेला सात मुली नंतर मुलगा झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.