---Advertisement---

जन्म-मृत्यूची नोंद न करणार्‍या ग्रामसेवकावर कारवाई करा; बिरसा फायटर्सची मागणी

---Advertisement---

नंदूरबार : बिलीचापडा येथील व्यक्तींची ग्रामपंचायत तुळाजा येथे जन्म मृत्यूची नोंद केली जात नाही , नोंद करावी व नोंद न करणा-या ग्रामसेवकाला सेवेतून काढून टाकण्याची कारवाई करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेतर्फे जि.प. मुख्य कार्यकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी निवेदनाची दखल घेत सावनकुमार यांनी तळोदाचे गटविकास अधिका-यांना लगेच फोन लावला व निवेदनावर तातडीने कारवाई करण्याचे तोंडी निर्देश दिले. पुन्हा बिलीचापडा गांवातील लोकांची ही तक्रार माझ्याकडे येता कामा नये,असे सुनावले.

निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, वनसिंग पटले, भोंडा पटले, किसन वसावे, दिनेश वळवी, हाना पटले, सुनील वसावे, जयसिंग वळवी, माधव वसावे आदि कार्यकर्ते नंदूरबार येथे उपस्थित होते.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment