जरांगेची तब्येत खालावली, छगन भुजबळ म्हणाले “पुन्हा उपोषण करण्याची गरज काय…”

मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. उपोषणामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. दरम्यान, यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ ?
मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. उपोषणामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांनी “जरांगेंना पुन्हा उपोषण करण्याची गरज काय  ?  जरांगेंनी त्रागा करु नये, आरक्षणाचे काम सुरु आहे” असं म्हटलं आहे.