जळगावकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; वाघूर धरण ७७ टक्के भरले

तरुण भारत लाईव्ह । १२ सप्टेंबर २०२३। जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील लहान मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ न झाल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग जमा झाले होते मात्र गेल्या पाच दिवसात झालेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यावरील दुष्काळाचे ढग काही अंशी दूर झालेले दिसून येत आहे.

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघुर धरण 77 टक्के भरले असल्याने यंदा तरी जळगावकरांना पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे यंदा जिल्ह्यात मानसून उशिराने दाखल झाला त्यातही जून महिन्यात जिल्ह्यात केवळ 45 मिलिमीटर पाऊस झाला. तर जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला मात्र वाघूर व गिरणा दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे लोणी धरणांच्या जलसाठ्यात फार काही वाढ झाली नव्हती.

ऑगस्ट महिना देखील कोरडा गेल्यामुळे जळगावकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठीची चिंता वाढली होती. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे वाघूर धरणाच्या जलसाठ्यात चांगली वाढ होत आहे.  77% पर्यंत पोहोचल्याने जळगावकरांचा यंदाचा वर्षाचा पिण्याचा तान मिटला आहे.  वाघूर प्रमाणेच गिरणा धरणाच्या जलसाठ्यात गेल्या सहा दिवसात अठरा टक्क्यांची वाढ झाली आहे.

त्यामुळे काही प्रमाणात गिरणा नदीवर अवलंबून असलेल्या गावांचीही काही प्रमाणात काही असेना चिंता मिटली आहे आगामी काळात चांगला पाऊस झाला तर गिरणा धरण 70 ते 75% पर्यंत भरू शकते. त्यामुळे गिरणा काठावरील गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या तर कमी होईलच मात्र रब्बी पिकांसाठी देखील एक दोन आवर्तन मिळू शकेल.