---Advertisement---

जळगावकरांची प्रतीक्षा संपली ! मुंबईसाठी २० जूनपासून विमानसेवा, इतके असेल तिकीट दर?

---Advertisement---

जळगाव । जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता जळगावहुन मुंबईसाठी विमानसेवा होणार आहे. येत्या २० जून पासून जळगाव-मुंबई विमानसेवा सुरु होणार असून भारत सरकारच्या एलाइन्स एअर या कंपनीतर्फे ही सेवा पुरवली जाणार आहे.

ही विमानसेवा सध्या आठवड्यातून गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर असणार आहे. जळगावातून संध्याकाळी ६.४५ वाजता फ्लाइट उड्डाण भरून मुंबईत ८.५ वाजता पोहचेल. परतीला रात्री ८.३० वाजता फ्लाइट निघून मुंबईत ९.४५ वाजता पोहचेल. विमान कंपनीने तिकीट विक्री सुरु केली असून या रुट्या आरसीएस सेवेत समावेश नाही. त्यामुळे तिकिटाची सुरुवात ३४४० रुपयांपासून होणार आहे

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment