---Advertisement---

जळगावचा पारा 46.3 अंशांवर; यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान ठरलं

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२४ । जळगाव जिल्ह्यात तापमान वाढीचा कहर पाहायला मिळत असून आता जळगावात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झालीय. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा हा वाढला असून जळगाव चे तापमान 46.3 अंशावर गेले आहेत. यामुळे जळगावचे जनजीवन विस्कळीत झाले.

जिल्ह्यात सध्या उष्णेतेची लाट सुरू असून सकाळपासून उन्हाच्या कडाक्याने अंगाची लाहीलाही होत आहे.दुपारच्या वेळेस तर रस्ते ओस पडले आहे. वाढत्या तापमानामुळे जळगावकर नागरिक हैराण झाले असून रुमाल टोपी घालूनच घराबाहेर पडावे लागत असून दैनंदिन कामे ही सकाळच्या सुमारास करून घ्यावी लागत आहे

दरम्यान, जिल्हा प्रशासनातर्फे विनाकारण बाहेर पडू नका असे आवाहन जळगावकर नागरिकांना करण्यात आले आहे. पुढील काळात देखील तापमानाचा पारा हा वाढू शकतो असे मत हवामान तज्ञांनी व्यक्त केले आहे

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment