---Advertisement---

जळगावचे सुपूत्र डॉ.नितीन कुलकर्णी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २ जुलै २०२३ । मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.सुरेश गोसावी आणि पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.रवींद्र कुलकर्णी या जळगाव जिल्ह्याच्या सुपूत्रांची नियुक्ती झाल्यानंतर आता देशातील सर्वात प्रतिष्ठीत महाविद्यालयांपैकी एक असलेल्या फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यपदी यावलच्या सुपुत्राची नियुक्ती झाली आहे.

जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र डॉ.नितीन मधुकर कुलकर्णी यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून सूत्रे स्वीकारली. हे कॉलेज देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार आहे. कॉलेजला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे. त्याचे प्राचार्यपद अनेक विद्वानांनी भूषवले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---