जळगावच्या मानसीची अनोखी कहानी; एकदा वाचाच…

डॉ.पंकज पाटील
जळगाव : येथील अयोध्यानगरातील रहिवासी असलेल्या मानसी हेमंत पाटील हिला अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्याने न्यायालयातर्फे रिलायन्स जनरल इंश्युरन्स कंपनीतर्फे 32 लाख 61 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मानसी पाटील ही 2014 मध्ये 17 वर्षाची असताना सायकलने शाळेत जात होती. खेडी गावाच्या बाहेर जानकी हॉटेलजवळ महामार्गावर टँकर क्रमांक एमएच 43 यु 2124 ने तीला धडक दिली होती. त्यात तीच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघात झाल्या झाल्या तीला समर्थ हॉस्पिटल व डॉ. अर्जुन भंगाळे यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले होते. पायाला गंभीर फ्रॅक्चर झाल्याने डॉक्टरांनी तीचा उजवा पाय गुडघ्याच्यावरून कापला. तीच्यावर औषधोपचार करून तीला दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली. तीने ॲड. महेंद्र चौधरी यांच्यातर्फे टँकर चालक मोहम्मद तजुर अलि नाजूर मोहम्मद व रिलायन्स जनरल इन्शुरंन्स कंपनीकडे विमाकृत असलेले सदर टँकर यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली.

सर्व परिस्थिती व तीचे भविष्य पाहता वकिलांनी जोरदार पणे बाजु मांडली. त्यानुसार न्यायमूर्ती बी.एस.वावरे यांनी कंपनीला 32 लाख 61 हजार नुकसान भरपाई देण्याची निकाल दिला. मात्र विमा कंपनीने मानसीला दोषी ठरवत तीने निष्काळजीपणाने सायकल चालवत मागील चाकात आली असल्याचा युक्तीवाद केला.

परंतु मानसीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की त्यावेळी अपघाताच्या ठिकाणी रस्त्यावर अनेक वाहने होती. अशा स्थितीत टँकर चालकाने वाहन हळू  व काळजीपूर्वक चालवणे गरजेचे होते. तसेच रस्ता हा महामार्गाचा होता. हा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह धरत नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

 8 वर्षानंतर मिळाला न्याय

मानसी हीने 2016 पासून तर 2023 पर्यत असे 8 वर्ष न्यायालयीन लढा दिला. न्यायालयाने सर्व बाबी तपासून तीच्या बाजुने निकाल दिला. मानसीकडून ॲड. महेंद्र चौधरी,ॲड. श्रेयस चौधरी, ॲड. हेमंत जाधव यांनी काम पाहिले.

नृत्याची अखंड साधना

मानसी हीला लहापणापासून नृत्याची आवड आहे.अपघातामुळे तीला पाय गमवावा लागला असला तरी ती एका पायावरही चांगले नृत्य करत आहे.