जळगावसह राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट ; पुढचे ४ दिवस असं राहील हवामान?

जळगाव । महाराष्ट्राला पुन्हा एकदा जोरदार पावसानं झोडपून काढलं आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी खरिपाचे पिके पाण्याखाली गेले आहे. अशातच हवामान खात्याने राज्यातील पावसाबाबत हवामान खात्याने मोठी दिली आहे. जळगावसह राज्यातील पाऊस ओसरणार असून आजपासून पुढच्या चार दिवसांत तापमानात वाढ होऊन उन्हाची तीव्रता वाढणार आहे.

खरंतर काही दिवसाच्या विश्रांतीनंतर जळगावसह राज्यात गेल्या आठवड्यात पावसाचं कमबॅक झालं होते. मागील तीन चार दिवसापासून जळगावसह राज्यातील विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. आता अशातच राज्यातील पाऊस ओसरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्टपर्यंत म्हणजे या चार दिवसांत १३ जिल्ह्यात हळूहळू पावसाचा जोर कमी होवून दुपारी ३ वाजताच्या सुमारास कमाल तापमानात वाढ होईल आणि हळूहळू उन्हाची ताप वाढण्याची शक्यता जाणवेल.

पावसाचा जोर पुन्हा वाढणार?
शनिवार ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंतच्या सहा दिवसांत संपूर्ण विदर्भ, खान्देश, नाशिक आणि मुंबई अशाया १६ जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे. राज्यातील ऊन- पावसाचा खेळ लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यांवी आणि सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

जळगावातही तापमानात वाढणार
दरम्यान, जळगावात मागील चार पाच दिवसात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा वाढला आहे. मात्र आज मंगळवारपासून पावसाचा जोर ओसरून तापमान दोन ते तीन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, २७ ऑगस्टपासून पावसाला अल्प ब्रेक लागेल. २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान उन्ह, सावली आणि ढगाळ वातावरण राहील. तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होऊन कमाल तापमान ३३ ते ३५ अंशांवर स्थिरावण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.