जळगावात आज महायुतीचा पहिला मेळावा, उपस्थित असणार तीन मंत्री

जळगाव : जळगाव लोकसभेच्या अधिकृत उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ आज मंगळवारी संध्याकाळी 06:15 वाजता आदित्य लॉन, एम आय डी सी, रेमंड चौक जवळ , जळगाव येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील,  मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार  मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष व महायुतीचे समन्वयक संजय पवार, भाजप जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, भाजप जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, भाजप लोकसभा निवडणूक प्रमुख डॅा.राधेश्याम चौधरी, शिवसेना जळगाव जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, शिवसेना जळगाव जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, शिवसेना जळगाव जिल्हाध्यक्ष वासुदेव पाटील, जिल्हाध्यक्ष मनसे जमील देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मीनल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोनाली पाटील, शिवसेना सरिता कोल्हे , शिवसेना गणेश सोनवणे , RPI आठवले गट आनंद खरात, आठवले RPI अनिल अडकमोल , RPI कवाडे गट राजू मोरे, लहूजी सेना दिनेश खरात, रासप सुर्यवंशी आदी उपस्थित असणार आहेत.