---Advertisement---

जळगावात चोरट्यांचा मोर्चा शाळेकडे, 25 हजाराची रोकड लांबवली

---Advertisement---

जळगाव : शहरातील सावखेडा शिवारात असलेल्या वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी सीबीएससी इंग्लिश स्कूलमध्ये चोरट्यांनी ऑफिसचे कुलूप तोडून 25 हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवार, 24 मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांचा मोर्चा शाळेकडे
जळगाव शहरातील सावखेडा शिवारात वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी सीबीएससी इंग्लिश स्कूल असून या स्कूलमध्ये एका ऑफिसमध्ये २५ हजारांची रोकड व कागदपत्रे ठेवली होती. चोरट्यांनी शाळेच्या मागील कंपाऊंडच्या भिंतीवरून आत प्रवेश करत शाळेच्या मुख्य इमारतीच्या चैनल गेटचे कुलूप तोडले त्यानंतर शाळेच्या ऑफिसचे कुलूप तोडून ऑफिस मधील पंचवीस हजार रुपयांची रोकड व काही कागदपत्रे चोरट्यांनी चोरून दिली. 16 मार्च रोजी सकाळी सहा वाजता साडेसहा वाजेच्या सुमारास कर्मचारी नेहमीप्रमाणे शाळेत आले असता त्यांना ऑफिसचे तसेच मुख्यमंत्री तुटलेले दिसून आले. ऑफिसमध्ये तपासणी केली असता पंचवीस हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे दिसून आले.

याप्रकरणी प्रा.आशिष चंद्रकांत अजमेरा यांनी गुरुवार, 24 मार्च रोजी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल लीलाधर महाजन हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment