जळगाव : पाणी भरण्याच्या बहाण्याने १० वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलवून एका तरूणाने तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत तरूणाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहरातील एका परिसरात १० वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आई-वडीलांसह वास्तव्यास आहे. रविवारी दुपारी ३ वाजता तिला एका तरूणाने पाणी भरण्याच्या बहाण्याने घरामध्ये बोलविले. त्यानंतर मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.
हा प्रकार मुलीच्या कुटूंबियांना कळाल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार तरूणाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.