जळगावात दिवसा पारा, रात्री सुसाट वारा; होर्डिंग कोसळले

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चागंलाच वाढला असताना, आज रात्री आठच्या सुमारास जळगाव शहरात सुसाट वारा सुटला. वादळामुळं रस्त्यांवरून चालणे कठीण झाले असून संपूर्ण रस्ते धुळीने माखले आहे. नूतन मराठा महाविद्यायासमोरील लावलेले होर्डिंग कोसळले, काही भागात झाडे उन्मळून पडली आहेत. तर शहारातील काही भागात वीज खंडित झाली आहे.

जळगाव शहरात उन्हाचा पारा आज शनिवारी दिवसा ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला. पण, रात्री वादळवारा सुटला. त्यामुळं तापमानात घट होऊन ३२ सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चागंलाच वाढला असताना, आज रात्री आठच्या सुमारास जळगाव शहरात सुसाट वारा सुटला. वादळामुळं रस्त्यांवरून चालणे कठीण झाले असून संपूर्ण रस्ते धुळीने माखले आहे.

होर्डिंग कोसळले

नूतनमराठा महाविद्यायासमोरील लावलेले होर्डिंग कोसळले आहेत. तसेच या अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

रविवारी वाऱ्यांचा ताशी वेग १२० किमीपर्यंत पोहोचू शकतो!

आयएमडीने शुक्रवारी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये असं म्हटलं की, शनिवारी रात्रीपर्यंत रेमन चक्रीवादळ रौद्ररुप धारण करू शकते. हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांग्लादेश किनारपट्टीला धडकण्याची दाट शक्यता आहे. रविवारी वाऱ्यांचा ताशी वेग १२० किमीपर्यंत पोहोचू शकतो. परिणामी २६ आणि २७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टी भागात तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे.

रेमन चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, उत्तर २४ आणि दक्षिण २४ परगणा, त्याचबरोबर पूर्व मिदनापूरच्या किनारी जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर उत्तर ओरिसा, बंगाल, त्रिपुरा, दक्षिण मणिपूर आणि मिझोराममध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.