पारोळा : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळू पाटील यांनी भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खिंडार पडला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पारोळा एरंडोल विधानसभा निवडणूक प्रमुख करण पवार यांच्या उपस्थितीत श्री पाटील भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, शहराध्यक्ष मनीषकुमार पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रवीण पाटील, नगरसेवक पी. जी. पाटील, भैया चौधरी, कैलास पाटील, किरण पाटील, प्रसाद महाजन उपस्थित होते.