जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकेगाव गावाजवळील वाघुर नदीवरील पुलावर बसच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेल्या महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवार, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
अपघातात दुचाकीचा बसच्या मागच्या चाकात आल्याने चुराडा झाला आहे. जखमी झालेल्या महिलेला तातडीने नजीकच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान या अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झाला होता. यावेळी भुसावळ तालुका पोलीसांनी देखील घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव समोर आलेले नाही. पुढील चौकशीचे काम पोलीस कर्मचारी करीत आहे.