---Advertisement---

जळगावात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद ; पारा आणखी वाढणार? वाचा काय आहे अंदाज

---Advertisement---

जळगाव । गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ होत दिसत असून रविवारी तर जळगाव जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. रविवार कमाल तापमानने ४४ अंशाचा टप्पा गाठला. आगामी चार दिवस आणखी तापमानात वाढ होण्याचा अंदाज असल्‍याने जळगावकरांची लाही लाही होणार आहे.

हवामान विभागाकडून १९ ते २४ मे दरम्यान जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशातच उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार रविवारी शहरात तब्बाल ४४ अंश एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान, आज सोमवारपासून तापमानात अजून एक किंवा दोन अंशाची वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सध्या तापमान वाढीने प्रचंड उकाडा जाणवत असून या उकाड्यापासून कधी सुटका होणार, याची जळगावकर असोशीने वाट पाहत आहेत. मात्र, आगामी आणखी चार दिवस उष्णतेच्या लाट काय राहणार असून या दरम्यान तापमान ४५ अंशावर जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे

दरम्‍यान उकाड्यात कमालीची वाढ झालेली असून, दिवसा घर, कार्यालयाला बाहेर पडताना आवश्‍यक खबरदारी घेतली जात आहे. तर रात्रीच्‍या वेळी उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी कुलर, एसीचा आधार घेतला जातो आहे. दरम्यान जिल्ह्यात आठवडाभर तापमान वाढलेले राहिल. मात्र त्यानंतर म्हणजेच पुढील आठवड्यात जळगाव जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो. त्यामुळे तापमानात पुन्हा घट होईल. २६ मे नंतर मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment