जळगावात सबस्टेशन आवारातील गवताला आग; विद्यूत पुरवठा तात्काळ बंद

जळगाव : औद्योगीक वसाहतमधील ए-सेक्टरमधील पीपल्स बँकेसमोर असलेल्या महावितरण कंपनीच्या सबस्टेशनच्या आवारात असलेल्या गवताला किरकोळ आग लागली. ही घटना गुरूवार २ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. महापालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होत आग आटोक्यात आणली. याप्रकरणी पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतमधील ए-सेक्टरमधील पीपल्स बँकेसमोर महावितरण कंपनीचे सबस्टेशन आहे. गुरूवारी २ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सबस्टेशन येथील गवताला अचानक आग लागली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महापालिकेचे दोन अग्नीशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी येथील विद्यूत पुरवठा तातडीने बंद करण्यात आला.

ही आग बंबाद्वारे विझविण्यात आले आहे. दरम्यान या आगीत इतर कोणतेही वस्तू जळालेले नाही. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.