जळगाव । रब्बी हंगामातील धान्य खरेदीला सुरुवात झाली असून, जळगाव बाजार समितीत हरभऱ्याला हमीभावापेक्षाही जास्तीचा भाव मिळाला. पहिल्याच दिवशी हरभऱ्याला ५,८०० रुपयांचा भाव मिळाला आहे. दुसरीकडे तुरीला देखील हमीभावापेक्षा जास्त भाव मिळतोय.
यंदा पाऊस कमी झाल्यामुळे रब्बी – पिकांवर परिणाम होईल, अशी स्थिती होती. मात्र, नोव्हेंबर अखेरीला जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना काही प्रमाणात फायदा झाला आहे. रब्बी हंगामातील धान्य खरेदीला सुरुवात झाली असून, जळगाव बाजार समितीत हरभऱ्याला पहिल्याच दिवशी ५,८०० रुपयांचा भाव मिळाला आहे.हरभऱ्याला हमीभाव ५ हजार ४४० रुपये एवढा आहे. मात्र, हमीभावापेक्षाही हरभऱ्याला ३६० रुपयांचा जास्तीचा भाव मिळाला आहे.
तर तुरीच्या दरातदेखील वाढ झाली. तुरीच्या दरात 200 रुपयाची वाढ झाली असून यामुळे आता जळगाव बाजार समितीत तुरीचे दर ९ हजार ७०० रुपयांवर पोहचले आहेत. तुरीला ७ हजार रुपयांचा हमीभाव आहे. हमीभावापेक्षा तब्बल २,७०० रुपयांचा अधिकचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. आगामी महिनाभरात भावात काही प्रमाणात चढ उतार होऊ शकतात.