जळगाव: केळीवर पुन्हा सीएमव्ही वायरसचा प्रादुर्भाव

तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। जिल्ह्यात केळी उत्पादकांसमोरील समस्या कमी होताना दिसून येत नसून गेल्या वर्षाप्रमाणेच केळीवर यंदाही कुकंबर मोझॅक सीएमव्ही या वायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे, जळगाव जिल्ह्यातील सुमारे आठ हजारअधिक हेक्टर क्षेत्रावर या व्हायरसचा प्रादुर्भाव दिसत असून यावर वेळीच  उपाययोजना झाल्या नाहीत तर गेल्या वर्षाप्रमाणेच केळीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा, रावेर, यावल, जळगाव, या तालुक्यातील अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळीवर सीएमव्ही चा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड होत असते. त्यापैकी आठ हजार हेक्टर क्षेत्रावर काही प्रमाणात का असेना सीएमव्ही चा प्रादुर्भाव दिसल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. तसेच सीएमव्ही सह जिल्ह्यात केळीवर करपा या रोगासाठी प्रादुर्भाव वाढला आहे प्रशासनाकडून याबाबत उपाययोजना करण्याची मागणी उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

करपा रोगामुळे केळीची पाने पिवळी पडतात त्यावर काही प्रमाणात काळसर डाग देखील पडतात. त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया थांबते व केळीची वाढ देखील खुंटते  यामुळे केळीच्या उत्पादनात देखील मोठी घट होते. हा एक व्हायरस असून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पसरतो हा एक संसर्गजन्य रोग आहे. केळीमध्ये आंतरपीक घेतल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.

बुरशीजन्य किंवा इतर कोणत्याही खत मारून देखील याचा प्रादुर्भाव कमी होत नाही. केळी उत्पादकांना झाड उपटून फेकून देण्याशिवाय अन्य पर्याय शेतकऱ्यांकडे नसतो. केळीवर करपा सह सीएमव्ही चा देखील प्रादुर्भाव वाढल्याने कृषी महासंचालक मोहन वाघ यांनी धुळे नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील कृषीचे अधीक्षकांना सीएमव्ही च्या वाढत्या प्रादुर्भावावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.