जळगाव जिल्हा न्यायालयांतर्गत बंपर भरती जाहीर ; 7वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील न्यायालयात बंपर जागांवर भरती होणार आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा न्यायालयांतर्गत विविध पदे भरली जातील.  7वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरी मिळविण्याची एक उत्तम संधी चालून आली आहे.

या भरतीद्वारे “लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” पदे भरली जाणार आहे. एकूण 166 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया उद्या म्हणजेच 4 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 18 डिसेंबर असणार आहे.

नोकरी ठिकाण – जळगाव
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 डिसेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2023

शैक्षणिक पात्रता:
लघुलेखक (निम्नश्रेणी): 
(i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि व मराठी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iv) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
कनिष्ठ लिपिक: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iii) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
शिपाई/ हमाल: 7 वी उत्तीर्ण व चांगली शरीरयष्टी.
(वरील शैक्षणिक पात्रता 2018 च्या भरतीनुसार आहे. यात बदल असू शकतो)

वयोमर्यादा: १८ – ३८ वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट).

पदाचे नाव आणि वेतनश्रेणी
लघुलेखक S-14 : 38600-122800
कनिष्ठ लिपिक S-6 : 19900-63200
शिपाई/हमाल S-1 : 15000-47600

जाहिरात पहा : PDF