जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघात विविध पदांची भरती, जाणून घ्या पात्रता?

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन (ई-मेल)/ ऑफलाईन या पद्धतीने अर्ज करावा लागेल. आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 25 मे 2023 आहे. एकूण पदे : 04

या पदांसाठी होणार भरती?? सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह या पदांसाठी ही भरती होणार आहे.

काय आहे पात्रता? सेल्स एक्झिक्युटिव्ह –M.B.A., PGDBM, BBA, DBM, अनुभव: डेअरी मार्केटिंगमध्ये 10 वर्षे. सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह – कोणताही पदवीधर, अनुभव : डेअरी मार्केटिंगमध्ये ५ वर्षे.

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्ष पर्यंत असावे.

नोकरी ठिकाण: अकोला आणि बुलढाणा जिल्हा / भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुका/ जामनेर, बोदवड, सोयगाव तालुका. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2023. आवेदन पाठवण्याचा ई-मेल पत्ता: [email protected] आवेदन पाठवण्याचा पत्ता: जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, पोस्ट बॉक्स. 32, शिवाजी नगर रोड, जळगाव (एमएस) 425001. जाहिरात पहा : PDF Application Form (अर्जाचा नमुना)