जळगाव जिल्ह्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा वाढला, वाचा कोणत्या धरणात किती टक्के जलसाठा?

जळगाव । जळगावकरांसाठी दिलासा देणारी एक बातमी आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार वर्षावामुळे जळगाव जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली असून एकूण पाणीसाठा ३५.८३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी पावसाळा सुरू झाला असला तरी पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली नव्हती. मात्र गेल्या आठवड्यातील शेवटच्या तीन-चार दिवसांत पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणांमधील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील धरणात आज मंगळवारपर्यंत एकूण ३५.८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेष गतवर्षीपेक्षा यंदाच्या जलसाठ्यात २ टक्क्याहून अधिकची वाढ दिसून आली. गेल्या वर्षी ३३.७३ टक्के जलसाठा होता. तर यंदा जिल्ह्यातील चार प्रकल्पामध्ये एक टक्केही जलसाठा झालेला नाहीय. दरम्यान, आगामी काही दिवसात मुसळधार पाऊस झाल्यास जिल्ह्यातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे…

धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा (टक्के)
हतनूर – यंदा २८.३९ टक्के – गतवर्षी ३०.९८
गिरणा – यंदा ३७.२० टक्के – गतवर्षी – ३४.३५
वाघूर – ६४.९६ टक्के – गतवर्षी – ५६.८६

मध्यम धरणांमधील सध्या स्थितीचा जलसाठा?
अभोरा – यंदा ७८.४२ टक्के – गतवर्षी १०० %
मंगरूळ- यंदा १०० टक्के – गतवर्षी १०० टक्के
सुकी – यंदा १०० टक्के – गतवर्षी १०० टक्के
मोर – यंदा ६९.९१ टक्के – गतवर्षी ६२.४७ टक्के
बहुळा – यंदा ११.८८ टक्के – गतवर्षी १०.६९ टक्के
अग्नावती – यंदा २.५८ टक्के – गतवर्षी ०० टक्के
तोंडापूर – यंदा ३८.११ टक्के – गतवर्षी ४३.४५ टक्के
अंजनी – यंदा ६.९३ टक्के – गतवर्षी ४३.८३ टक्के
गूळ – यंदा ६३.६६ टक्के – गतवर्षी ५२.०४ टक्के
शेळगाव बॅरेज – यंदा ०७.५६ टक्के – गतवर्षी ०० टक्के

या चार प्रकल्पांमध्ये जलसाठा शून्यावर
जिल्ह्यात ५ ऑगस्टपर्यंत १२५ टक्के पाऊस झाला आहे. एकूण सरासरीच्या ६८ टक्के पाऊस झाला असताना जिल्ह्यातील चार हिवरा, बोरी, मन्याड, भोकरबारी या प्रकल्पांमध्ये एक टक्केही जलसाठा झालेला नाही.