जळगाव : राज्यात बऱ्याच ठिकाणी आज दमदार पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात देखील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. बोदवड तालुक्यांतील लोणवाडी गावात अनेक घरात पाणी शिरले असून परिसर जलमय झाला आहे.
दरम्यान, पावसाला सुरु झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात सुरवातीला चांगला पाऊस झाला होता. मात्र काही भागात पाऊस अत्यल्पच झाला होता. तर रावेर, बोदवड, मुक्ताईनगर, यावल तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. यानंतर आज पुन्हा एकदा या परिसरात जोरदार पाऊस झाला आहे.
जोरदार पावसाने लोणवाडी परिसरात काही घरात पाणी शिरले असून, स्थानिक रहिवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचले असून पिके पाण्याखाली गेली आहेत. या पावसाचा फटका मका, कापूस आणि कडधान्य या पिकाला बसला आहे. शेतकऱ्यांच्या ऐन हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे.