जळगाव जिल्ह्यात पुन्हा लाचखोरीच्या घटना समोर! सरपंचासह पंटरला अटक

नाव लावण्यासाठी
जळगाव । जळगाव जिल्ह्यात लाचखोरी आठवड्यातून एक तरी घटना समोर येत आहे. आता यातच घरकुलासाठी जागा नावावर करून देण्याकरिता १० हजाराची लाच घेणाऱ्या पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील सरपंचासह खाजगी पंटरला जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईने खळबळ उडाली.

सरपंच अनिल विश्राम पाटील (वय ४६) व खाजगी पंटर बलराम हेमराज भील (वय ४६,दोन्ही रा. खडकदेवळा बु ता.पाचोरा) अशी दोघांची नावे आहेत. तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील रहिवाशी आहेत. तक्रारदाराला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. मात्र ते राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नसल्याने त्यांच्या नावावर गाव नमुना आठ अ मध्ये नाव लावण्यासाठीचे काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याच्या मोबदल्यात सरपंच अनिल पाटील यांनी १० हजार रुपयांची लाच मागणी केली.

याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी खाजगी इसमाकडे लाच देण्याचे सरपंचांनी सांगितल्यानंतर खाजगी इसम बलराम भिल याला लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. दोघांना अटक करण्यात आली व पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई?
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने तसेच पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, हवालदार रवींद्र घुगे, सुनील वानखेडे, शैला धनगर, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.