तरुण भारत लाईव्ह । १३ सप्टेंबर २०२३। सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आज जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. दरम्यान 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान पुन्हा या महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळाची शक्यता आधी वर्तवली जात असताना सप्टेंबरमधील पाऊस ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात यंदा पावसाचा खंड व जोरदार पाऊस असा बदललेला पावसाचा पॅटर्न दिसून येत आहे. जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली त्यानंतर जुलै महिन्यात सरासरी पेक्षाही अधिक पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली तर सप्टेंबर महिन्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस जिल्ह्यात सहा ते नऊ सप्टेंबर दरम्यान १०९ पाऊस झाला तर आता पंधरा ते सतरा सप्टेंबर पुन्हा ९० ते १०० मीमी पाऊस होण्याची शक्यता आहे.
जर एवढा पाऊस झाला तर जिल्हा सरासरीत का पाऊस परिणाम असतानाही होऊ शकतो. सप्टेंबर महिन्याच्या पहिलाच आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाल्यामुळे जिल्ह्यात पाऊस झाला होता, आता पुन्हा काही दिवसांच्या खंडानंतर बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे 14 सप्टेंबर पासून हे शेत्र ओडिषा मार्गे छत्तीसगड विदर्भ करत उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे 15 ते 17 दरम्यान जळगाव जिल्हासह नंदुरबार मालेगाव धुळे जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.