जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट; नागरिकांना सावधानतेचा इशारा

तरुण भारत लाईव्ह । ८ सप्टेंबर २०२३। प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिनांक ७\९\२०२३ रोजी सायंकाळी साडेसात वाजता दिलेल्या सतर्कतेचा इशाऱ्यानुसार जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जरी केलेला आहे. सदरचा रेड अलर्ट पुढील तीन तासांसाठी मर्यादित आहे प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या द्वारा प्राप्त इशारा कळवण्यात येईल. जिल्ह्यात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

या गोष्टी कराव्या
विजेच्या गडगटासह पावसाची पूर्वकल्पना बाहेर जाणे टाळावे. जर मोकळ्या जागेत असाल तर जवळपास सुरक्षित इमारतीचा आसरा असेल तर मोकळ्या जागेत जाऊन डोकं गुढग्यात ठेवून बसा. अशावेळी घराच्या गच्चीवर तसेच बाल्कनीत थांबू नये. घरातले विजेचे उपकरण चालू असेल तर त्वरित बंद करा. लोखंडी वस्तूंपासून दूर रहावे.

काय करू नये
आकाशात वीज चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नये. तसेच शॉवरखाली अंघोळ करू नये. पाइपलाईन ला स्पर्श करू नये. उंच झाड्याचा खाली आसरा घेऊ नये.