कासोदा : येथील आठवडे बाजारात गेल्या काही महिन्यांपासून चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. दर मंगळवारी येथे आठवडे बाजार भरत असतो. यात गर्दीचा फायदा घेत, बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या खिच्यातील मोबाईल, पैसे चोरून नेल्याच्या घटना वारंवार घडत असल्याची माहिती नागरिकांनी दिलीय.
कासोदा येथे मगळवारी आठवडे बाजार भरत असतो. जवळपास १४ ते १५ खेडी लागुन आहे. शेतकरी व मजूर वर्ग साधारणतः ३ ते ५ वाजेदरम्यान बाजारासाठी येतात. यावेळी बाजारात मोठी गर्दी उसळलेली असते. त्याचवेळी चोरट्या महिला व त्यांच्यासोबत लहान मुले बाजारात गर्दी करीत असतात. मोबाईल चोरताना धक्का मारणे व लगबगीने ढकलणे असे प्रकार करतात बाजार करणाऱ्या व्यक्तीला गर्दीत असे होते म्हणून ते दुर्लक्ष करतात. त्याचा फायदा घेवून मोबाईल व पर्स चोरली जाते. सोबत असलेल्या व्यक्तीकडे ते चोरलेल्या वस्तू व इतर साहित्य देवून तेथून पळ काढला जातो. अशा चोरी करण्याच्या पद्धतीचा वापर सराईत चोरट्याकडून केला जातो. बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा ही टोळी सक्रिय झालेली दिसते.
कासोदा पोलीस स्टेशन मधील बऱ्याच कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे . नविन स्टॉफ आला आहे .बाजारात पोलीसांची गस्त असली पाहिजे त्या मुळे अश्या चोरट्यांना पायबंद होईल अशी नागरिकांची मागणी आहे . आजच्या आठवडे बाजारात 3 व्यक्तीचे मोबाईल व महिलेची पर्स त्यातील बाजाराचे १७०० रुपये व त्यातील मोबाईल चोरी झाली आहे. या घटनेकडे कासोदा पोलीसांनी जातीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
कासोदा पोलीस सटेशन येथे सपोनि निलेश राजपूत आल्यानंतर बरीचशी शिस्त दिसून येत असली तरी अश्या चोरट्यांमुळे कासोदा पोलीसांनपुढे अव्हान र्निमाण झाले आहे .४ व्यक्तीनी मोबाईल चोरी झाल्याची माहिती पोलीस स्टेशनला जाऊन दिली व या बाबत तक्रार केलेली आहे .सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत हे तातडीने पोलीस स्टेशनला हजर झाले व त्यांनी आपल्या स्टाफला त्वरित चौकशीचे आदेश दिलेले आहेत . बघुया कासोदा पोलीस मोबाईल चोरांना पकडतात की नेहमी प्रमाणे तपास सुरू आहे. असे उत्तर मिळते .यांची प्रतिक्षा तक्रारदार यांना आहे .