---Advertisement---

जळगाव जि.प.तील तीन कर्मचारी रडारवर; कारवाई अटळ ? काय आहे प्रकरण

---Advertisement---

जळगाव : शासकीय आशादीप महिला वसतिगृहाच्या अधीक्षिका मयुरी देवेंद्र राऊत-करपे यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या नातेवाइकांनी केलेल्या आरोपांची चौकशी विभागीय आयुक्त करणार आहेत. त्यामुळे महिला व बालविकास विभागातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांच्या विभागातील तिघांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. चौकशीनंतर दोषी आढळल्यास या तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई अटळ आहे, अशी माहिती जि.प. सूत्रांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून राऊत यांची प्रकृती खराब असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानुसार शनिवार, १४ रोजी   तपासणीसाठी त्यांच्या पत्नी मयुरी राऊत या त्यांना खासगी रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या, त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर मयुरी यांच्या नातेवाइकांनी कारवाईसाठी मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी दिलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त व मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम या आरोपांची चौकशी करणार आहेत.

दरम्यान, संगमनेरात मयुरी यांच्यावर अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर देवेंद्र राऊत यांची काही अधिकाऱ्यांनी भेट घेतली. जि.प. सीईओंसह अन्य वरिष्ठांनी दबाव नव्हे, तर त्यांच्या विभागातील तीन कर्मचाऱ्यांनी नेहमीच अडचणीत आणण्याचे आणि कार्यालयीन कामकाज टाळण्याचे काम केल्याचा राग त्यांनी व्यक्त केल्याची सांगण्यात आले. त्यामुळे चौकशीनंतर दोषी आढळल्यास या तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई अटळ आहे, अशी माहिती जि.प. सूत्रांनी दिली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment